लग्नाच्या पंधरा दिवस अगोदर तरुणाची आत्महत्या.

लग्नाची तारीख जवळ आली असताना आत्महत्या केल्याने हळहळ.

राहुरी :- तालुक्यातील गोटुंबा आखाडा येथील गवंडीकाम करणाऱ्या तरुणाने गळफास घेत आपली जीवनयात्रा संपवली.

प्रवीण साळवे (२४ वर्षे) असे या तरूणाचे नाव असून पंधरा दिवसांवर त्याचे लग्न आले होते.

मंगळवारी सकाळी राहुरी-शिंगणापूर रस्त्यावरील गोटुंबा आखाडा येथील विद्यापीठ प्रक्षेत्रावर आत्महत्येची ही घटना उघड झाली.

गळफास लावून तरूणाने आत्महत्या केल्याची खबर परिसरात पसरल्याने घटनास्थळी बघ्यांची गर्दी जमली होती.

मृताची मोटारसायकल व काही आक्षेपार्ह गोष्टी घटनास्थळी आढळल्याने याबाबत तर्कवितर्क सुरू आहेत.

सोमवारी रात्री घरातून बाहेर पडलेला प्रवीण परत न आल्याने नातेवाईकांनी त्यांचा सर्वत्र शोध घेतला. मात्र, तो सापडला नाही.

मंगळवारी सकाळी गळफास घेतलेल्या अवस्थेत तो आढळला. या प्रकरणी अकस्मात मृत्यूचा गुन्हा दाखल झाला आहे.

लग्नाची तारीख जवळ आली असताना प्रवीणने आत्महत्या केल्याने हळहळ व्यक्त होत आहे.

728 X90 Jeep Car