अहमदनगर जिल्हापरिषदेत 729 जागांसाठी भरती !

26 मार्च ते 16 एप्रिल दरम्यान उमेदवारांना अर्ज मुदत.

अहमदनगर :- जिल्हा परिषदेत रिक्त असणार्‍या 729 जागांसाठी येत्या 26 मार्चपासून भरती प्रक्रीया राबविण्यात येणार आहे.

राज्य सरकार पातळीवरून होणार्‍या भरतीसाठी राज्यातून कोणत्याही जिल्ह्यातून उमेदवारांना ऑनलाईन अर्ज करता येणार आहे.

भरतीचे पूर्ण अधिकारी आणि प्रक्रिया राज्य सरकार पातळीवरून राबविण्यात येणार आहे. जिल्हा परिषदेतील अनुसूचित्र क्षेत्राबाहेरी आणि अनुसूचित क्षेत्रातील गट क या संवर्गातील रिक्त पदांसाठी भरती प्रक्रिया राबविण्यात येणार आहेत.

या प्रक्रियेचा पहिला टप्पा म्हणून रिक्त जागांसाठी उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येणार आहेत. येत्या 26 मार्च ते 16 एप्रिल दरम्यान उमेदवारांना अर्ज करता येणार आहे.

अशी आहेत पदे व रिक्त जागा

आरोग्य सेवक पुरूष (50 टक्के हंगामी फवारणी कर्मचारी) 118, आरोग्य सेवक पुरूष (40 टक्के सर्वसाधारण) 82, आरोग्य सेवक (महिला) 329, अंगणवाडी पर्यवेक्षीका 8,

वरिष्ठ साहय्यक लिपीक 11, वरिष्ठ सहाय्यक लेखा 12, कनिष्ठ लेखा अधिकारी 4, आरोग्य सेवक पुरूष (50 टक्के हंगामी फवारणी कर्मचारी) 9,

आरोग्य सेवक पुरूष (40 टक्के सर्वसाधारण) 6, आरोग्य सेवक महिला 23 आणि अंगणवाडी पर्यवेक्षीका 1.औषधनिर्माता 13, विस्तार अधिकारी (कृषी) 2,

विस्तार अधिकारी (ग्रामपंचायत) 1, विस्तार अधिकारी महिला बालकल्याण 2, प्रयोग शाळा तंत्रज्ञ 3, कंत्राटी ग्रामसेवक 65, स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक 48

728 X90 Jeep Car