लोकसभेसाठी सर्व पक्षांकडून मला ऑफर – आ.शिवाजी कर्डिले.

मात्र लोकसभा लढवण्याचा कोणताही विचार नाही

राहुरी :- सलग पाच वेळा आमदार आणि निवडून येण्याची खात्री असल्यामुळे मला सर्वच पक्षांकडून लोकसभा निवडणूक लढवण्याची ऑफर येत आहे. परंतु मी भाजपमध्येच खूश आहे.

लोकसभा लढवण्याचा कोणताही विचार नाही, असे आमदार शिवाजी कर्डिले यांनी सोमवारी स्पष्ट केले. शिराळ येथे सुमारे पावणेचार कोटींच्या विविध विकासकामांना प्रारंभ करताना आमदार कर्डिले बोलत होते.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी युवानेते अक्षय कर्डिले होते. राहुरीच्या विविध संस्थांना ज्यांच्यामुळे कुलूप लावण्याची वेळ आली

ते आता निवडणुका जवळ आल्याने पाथर्डी व नगर तालुक्यात पगारी माणसं नेमून स्वताचे मार्केटींग करण्याचा प्रयत्न करत आहेत, अशी टीका कर्डिले यांनी यावेळी तनपुरेंवर केली.

728 X90 Jeep Car