नापिकीमुळे तरूण शेतकऱ्याची आत्महत्या.

राहुरीतील सुनील कारभारी पटारे यांची आत्महत्या.

राहुरी :- नापिकी, मुलीच्या लग्नाचे झालेले कर्ज फेडता आले नाही, यातून आलेल्या नैराश्यातून राहुरी तालुक्यातील वांबोरी येथील पटारे-पागिरे वस्तीवरील सुनील कारभारी पटारे (वय ४२) यांनी गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपवली.

काही महिन्यांपूर्वी थोरल्या मुलीचे लग्न करण्यासाठी उधारी व उसनवारीने पैशांची जुळवाजुळव केली आणि शेतीच्या उत्पन्नातून सर्व देणी देऊन टाकू, असे नियोजन पटारे यांनी केले होते.

परंतु दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली, बरीचशी शेती पडीक राहिली, जे काही पिकले त्यातही शेतीमालाचे भाव गडगडले, त्यामुळे पिकाला कवडीमोल भाव मिळाला.

परिणामी उत्पन्न घटले. यामुळे लग्नाचे कर्ज फेडणे तर दूरच पण प्रपंच चालवणेही मुश्किल झाल्याने हतबल झालेल्या पटारे यांनी रविवारी सकाळी १० वाजोच्या सुमारास घरी कोणी नसताना घराशेजारीच राहणाऱ्या चुलते ज्ञानेश्वर पटारे यांच्या घराशेजारील पत्र्याच्या शेडच्या खांबाला दोरीच्या साह्याने गळफास घेऊन जीवनयात्रा संपवली.

728 X90 Jeep Car