धारधार शस्त्राने मंदिरातच पुजार्‍याची हत्या !

जामखेड तालुक्यातील घटनेने खळबळ.

जामखेड :- तालुक्यातील खर्डा येथील दत्त देवस्थानचे प्रमुख कुशाबा तुळशीराम शिकारे (वय 50) यांचा अज्ञात व्यक्तीने धारदार शस्त्राने निर्घृण खून केला.

शनिवारी (दि. 2) रात्री साडेआठ वाजता शिकारी वस्तीवर ही घटना घडली दत्त मंदिरात नेहमी प्रमाणे भजनाची तयारी करण्यासाठी गेलेल्या मंदिरातील पुजारी यांचा अज्ञात व्यक्तीने धारधार शस्त्राने वार करून हत्या केली.

मात्र हत्या कशामुळे झाली हे अद्याप समजू शकलेले नाही. मयत कुशाबा शिकारे यांना धार्मिक क्षेत्राची आवड होती. शिकारे वस्ती येथे आपल्या घरा जवळच बांधण्यात आलेल्या दत्त मंदिरात ते पुजारी म्हणून काम पहात होते त्यांना गायन, भजन व कीर्तनाची आवड देखील होती.

अतिशय मनमिळावू व शांत स्वभावाचे आसनारे कुशाबा शिकारे यांना सर्व महाराज म्हणत असे.

शनिवार दि २ मार्च रोजी रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास शिकारे महाराज हे दत्त मंदिरात भजन आसल्याने तयारी करण्यासाठी मंदिरातील माईक व साऊंड सिस्टीम लावण्यासाठी गेले होते. 

मंदिरात प्रवेश करताच यावेळी त्याच्या पाळतीवर आसलेल्या एका अज्ञात इसमाने त्यांच्या तोंडावर व गळ्यावर धारधार शस्त्राने पाच ते सहा वार केले व मंदिराच्या पाठीमागे अंधाराचा फायदा घेऊन पळुन गेला. 

यानंतर त्यांनी आरडाओरड केली असता त्यांचा मुलगा व पत्नी मंदिराकडे धावत गेले या वेळी शिकारे महाराज रक्ताच्या थारोळ्यात पडले होते. 

या नंतर त्यांच्या मुलाने व गावातील व्यक्तीने त्यांना मोटारसायकलवर खर्डा येथील दवाखान्यात दाखल केले.

मात्र डॉक्टरांनी त्यांना घेतले नसल्याने पुढील उपचारासाठी जामखेड ग्रामीण रुग्णालयत दाखल केले मात्र पुर्वीच त्यांची प्राणज्योत मालवली होती. 

शिकारे महाराज यांची हत्या कोणत्या कारणाने झाली हे अद्याप समजू शकलेले नाही याचा तपास पोलीस करीत आहेत. त्यांच्यावर सकाळी ग्रामीण रुग्णालय शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला.

728 X90 Jeep Car