सुजय विखे म्हणतात तुम्ही जेवढे वाकड्यात शिराल, तेवढाच मी ही वाकड्यात शिरु शकतो…

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

संगमनेर :- थोरात गटाचा वाढता हस्तक्षेप आता सहनशिलतेच्या पलिकडे गेला आहे. इतकी वर्षे आम्ही तुमचा त्रास सहन केला. पण आता आमचा संयम सुटला आहे, अशी टीका डॉ. सुजय विखे पाटील यांनी केली आहे.

निमोण येथे सरपंच संदीप देशमुख यांच्या नेतृत्वाखाली डॉ. सुजय विखे पाटील यांच्या उपस्थित युवक व शेतकरी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. 

तुम्ही जेवढे वाकड्यात शिराल, तेवढाच मी ही वाकड्यात शिरु शकतो. लोकशाही प्रक्रियेतून सरपंचपदावर निवडून आलेल्या संदीप देशमुखांवर दडपशाही करुन त्यांचे पद घालविण्याचा प्रयत्न केला जात आहे.

अशी दडपशाही करणार्‍यांचे राजकारण नक्कीच अडचणीत येते, हा महाराष्ट्राचा इतिहास आहे, अशा शब्दांत डॉ. सुजय विखे पाटील यांनी आ. थोरात यांच्या कार्यकर्त्यांना सुनावले.

डॉ. विखे म्हणाले, शिर्डी विधानसभा मतदारसंघात समाविष्ट असलेल्या संगमनेर तालुक्यातील अनेक गावांमध्ये थोरात गटाचा हस्तक्षेप वाढला आहे.

संगमनेर, पंचायत समितीच्या माध्यमातून मिळणार्‍या वैयक्तिक लाभांच्या योजनांची अंमलबजावणी फक्‍त आश्‍वी गटातील गावांमध्येच होते.

तालुक्यातील इतर गावे ओस पडली आहेत. पाण्याचे टँकर देता येत नाहीत. त्यांना हिच 6 गावे दिसतात. तळेगाव, निमोणला पाण्याचे टँकर का पाठवत नाहीत,

त्यांचे टँकर कोल्हेवाडी, निमगावपर्यंत येत असतील, तर आमचेही टँकर आता तळेगाव, निमोणपर्यंत येतील, अशी प्रखर टीका विखे यांनी केली.

Leave a Comment