महिलेचा विनयभंग करणाऱ्या एसटी चालकावर गुन्हा दाखल.

आरोपीस अटक करण्याची जिल्हा पोलिस प्रमुखांकडे मागणी.

पाथर्डी :- शहरातील उपनगरात राहणाऱ्या महिलेचा एसटी चालकाने विनयंभग केला. हा प्रकार मंगळवारी सकाळी दहाच्या सुमारास घडला. झालेला प्रकार कोणाला सांगितला, तर तुझी समाजात बदनामी करील अशी धमकी देणारा बसचालक दत्तू सावळेराम खेडकर याच्याविरुद्ध पोलिसांनी विनयभंगाचा गुन्हा दाखल केला.

संबंधित महिलेच्या पतीचे गॅरेज आहे. पती आजारी असल्याने ते दवाखान्यात गेले होते. महिला गॅरेजवर थांबली होती. दत्तू खेडकर (चिंचपूर इजदे) सकाळी दहा गँरेजवर आला. तुझा नवरा येथे नाही ते बरे झाले, असे म्हणत त्याने महिलेचा विनयभंग केला.

पोलिसात तक्रार दिलीस व कोणाला काही सांगितले, तर तुझी बदनामी करेन, अशी धमकी त्याने दिली. महिलेने पोलिसात तक्रार दाखल केली. खेडकरने मला माझ्या मूळ गावीही त्रास दिला. मग आम्ही पाथर्डीत रहायला आलो. येथेही घरी व गँरेजवर येऊन तो नेहमी त्रास देतो.

मी एसटीच्या संघटनेचा नेता आहे. पोलिस स्टेशन माझ्या खिशात आहे, असे तो सांगतो. त्याला तातडीने अटक करावी, अशी मागणी या महिलेने जिल्हा पोलिस प्रमुखांकडे निवेदनाद्वारे केली आहे.

728 X90 Jeep Car