उसाच्या ट्रॅक्टरला धडकून शिक्षिका ठार

राहुरीतील वांबोरीच्या महिलेचा दुर्दैवी मृत्यू.

राहुरी :- उसाने भरलेल्या ट्रॅक्टरवर धडकून गुंजाळे येथील प्राथमिक शिक्षिका जागीच ठार झाली.वांबोरीजवळ कात्रडफाट्याजवळ मंगळवारी दुपारी ४ वाजण्याच्या दरम्यान ही घटना घडली.

याबाबत सविस्तर माहिती अशी कि, वांबोरी केंद्राच्या गुंजाळे येथील प्राथमिक शाळेतील शिक्षिका सुनंदा महेश कोकणे (वय ३२) या आपल्या स्कुटीवर गुंजाळेकडून वांबोरीच्या दिशेला जात होत्या.

ऊस घेऊन जाणाऱ्या ट्रॅक्टरला (एमएच २८ एजे ४७८१) धडकून कोकणे ठार झाल्या. वांबोरी ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन केल्यानंतर कोकणे यांचा मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात दिला.

728 X90 Jeep Car