हकालपट्टी होण्याअगोदरच घनश्याम शेलार यांनी शिवसेना सोडली !

शिवसेनेचे माजी तालुका उपप्रमुख संतोष इथापे यांची टीका.

श्रीगोंदा :- घनश्याम शेलार यांनी पक्षात येऊन संघटना खिळखिळी केली. स्वतः बरोबर पक्ष बदलत फिरणाऱ्यांना त्यांनी प्रमुख पदे दिली. पक्षाचा मनमानी वापर केला.

बाजार समिती, जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुकीत त्यांना एकही जागा निवडून आणता आली नाही. नगरपालिका निवडणुकीत शिवसेनेचा जाणीवपूर्वक लंगडा पॅनेल उभा केला. नगराध्यक्षपदाचे दोन्ही उमेदवार माघारी घेतले.

त्याचे योग्य उत्तर त्यांना पक्षश्रेष्ठींना देता आले नाही. हकालपट्टी होण्याअगोदर त्यांनी पक्ष सोडला. खरा शिवसैनिक असे कधी वागत नाही.

सैनिक आदेश मानून चालतो, पण यांची आधीच सेटींग झाली होती, अशी टीका शिवसेनेचे माजी तालुका उपप्रमुख संतोष इथापे यांनी केली.

728 X90 Jeep Car