‘त्या’ माजी सरपंचाची एटीएसकडून चौकशी.

विसापूरचा माजी सरपंच जब्बार सय्यदला पोलिस कोठडी.

श्रीगोंदा :- पुलवामा दहशतवादी हल्ल्यात हुतात्मा झालेल्या जवानांना श्रद्धांजली अर्पण करण्याठी आयोजित करण्यात आलेल्या सभेत देशविरोधी वक्तव्य करणारा विसापूरचा माजी सरपंच जब्बार सय्यद याला न्यायालयाने एक दिवसाची पोलिस कोठडी दिली आहे.

दरम्यान, बुधवारी दिवसभर त्याची नाशिकच्या दहशतवाद विरोधी पथकाने (एटीएस) चौकशी केली. श्रीगोंदा तालुक्यातील विसापूर येथे हुतात्म्यांच्या श्रद्धांजली सभेत सय्यद याने देशविरोधी वक्तव्य केले होते. या प्रकारामुळे ग्रामस्थांनी आक्रमक होत गुन्हा नोंदविण्याची मागणी केली होती.

त्यानुसार बेलवंडी पोलिस स्टेशनला मंगळवारी (१९ फेब्रुवारी) गुन्हा नोंदविण्यात आला. त्यानंतर माजी सरपंच सय्यद याला अटकही करण्यात आली. त्याला बुधवारी (२० फेब्रुवारी) प्रथमवर्ग न्यायदंडाधिकाऱ्यांसमोर हजर केले असता तपासासाठी न्यायालयाने एक दिवसाची पोलिस कोठडी सुनावली आहे.

हा गंभीर प्रकार असल्याने नाशिक येथील दहशतवादी विरोधी पथकही श्रीगोंदा येथे आले. या पथकातील अधिकाऱ्यांनी सय्यद याच्याकडे यासंबंधी दिवसभर चौकशी केली.

728 X90 Jeep Car