किरकोळ वादातून वडिलांसह सावत्र भावास मारहाण.

लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण करून जिवे मारण्याची धमकी.

अहमदनगर :- किरकोळ वादातून सावत्र आई व सावत्र भावाने वडिलांसह युवकाला लाकडी दांडक्यासह लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण करून जिवे मारण्याची धमकी दिली. सारसनगर येथे ही घटना घडली.

याप्रकरणी भिंगार कँप पोलिस ठाण्यात सुनील रघुनाथ कदम, सोमनाथ सुनील कदम, अमोल सुनील कदम, रुक्मिणी सुनील कदम (सर्व रा. सारसनगर) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मारहाणीत सचिन सुनील कदम (रा.सारसनगर) हे जखमी झाले आहेत.

याबाबत पोलिसांकडून समजलेली माहिती अशी की, सचिन कदम यांनी मधुकर कानडे यांचे घरी भाड्याने राहतात. त्याने भाडे दिले नाही, तर त्यांचा पसारा ठेवून घरातून हाकलून द्या, असे त्याचे वडील सुनील कदम यांनी घरमालक मधुकर कानडे यांना सांगितले.

याबाबतची विचारणा करण्यासाठी सचिन कदम हे गेले असता त्यांना वडील व सावत्र भावांनी लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. सावत्र आईने केस धरून ओढले, तर वडिलांनी लाकडी दांडक्याने डोके व पाठीवर बेदम मारहाण केली. तसेच शिवीगाळ करून जिवे मारण्याची धमकी दिली.

या मारहाणीत सचिन कदम यांना दुखापत झाली आहे. त्यांच्या फिर्यादीवरून चौघांविरुद्ध भिंगार कँप पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस हवालदार मुळे हे करीत आहेत.

728 X90 Jeep Car