अल्पवयीन मुलीचा विनयभंग, दोन जणांविरोधात गुन्हा दाखल.

राहाता तालुक्यातील अस्तगाव येथील घटना.

राहाता :- अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याप्रकरणी अस्तगाव येथील दोन जणांविरोधात राहाता पोलिसात विनयभंगाचा गुन्हा दाखल झाला आहे.

याबाबत राहाता पोलिसांकडून मिळालेल्या माहिती अशी की, अस्तगावात राहणाऱ्या एका अल्पवयीन मुलीचे आई वडील बाहेरगावी गेले होते. आरोपी राजेंद्र रतन वाणी व इंद्रभान भाऊसाहेब गव्हाणे यांनी पीडित मुलीच्या राहत्या घरात पीडित मुलगी आणि तिची बहीण घरात एकट्याच असल्याचा फायदा घेत पीडित अल्पवयीन मुलीचा विनयभंग केला.

पीडित मुलीची आई गावावरून आल्यानंतर घडलेला प्रकार मुलीने आईस सांगितला. आई आरोपीस जाब विचारण्यास गेली असता आरोपी व त्याच्या एका नातेवाईकाने दि.१८ रोजी पोलिसात केस देऊ नका, नाही तर तुम्हाला जिवे मारून टाकू’ अशी धमकी दिली, अशी फिर्याद पीडित मुलीच्या आईने राहाता पोलिसात दिली.

728 X90 Jeep Car