मावस बहिणीशी विवाह करण्यासाठी विवाहीतेचा छळ.

सासरच्या १३ जणांविरोधात गुन्हा दाखल

अहमदनगर :- पत्नीच्या मावस बहिणीशी विवाह करण्यासाठी विवाहीतेकडे घटस्फोटाची मागणी करीत तिचा शारीरिक व मानसिक छळ करण्यात आला. या प्रकरणी सासरच्या १३ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी गुरुवार दि. १४ रोजी वाकड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

वाकड पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार पती जालिंदर निवृत्ती बडे, दीर भास्कर बडे, नंणद कस्तुरा भास्कर कुटे, भाचा सचिन भास्कर कुटे, नंणद सीता अर्जुन खाडे, भाचा ज्ञानेश्वर अर्जुन खाडे, नांदावा अर्जुन काशीनाथ खाडे, भाचा रामकिसन भीमराव खाडे, भाचा त्रिंबक भीमराव खाडे, मावस भाऊ गोरक्षनाथ रामभाऊ कारखेले, काका रामभाऊ कारखेले, मावशी जिजाबाई कारखेले यांच्यासह शिवगाव येथे राहणाऱ्या त्या मावस बहिणीवर देखील गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

वरिष्ठ पोलीस निरीक्षक सतीश माने यांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी पती जालिंदर आणि फिर्यादी महिलेचा सन १९९७ मध्ये विवाह झाला आहे. मात्र जालिंदरला पत्नीच्या मावस बहिणीसोबत विवाह करायचा होता. त्यासाठी सर्व नातेवाईकांनी मिळून फिर्यादी विवाहीतेकडे घटस्फोट देण्याची मागणी केली. फिर्यादी यांनी त्यासाठी नकार दिला असता, सर्वांनी मिळून त्यांना शिवीगाळ करत मारहाण करीत छळ केला.

728 X90 Jeep Car