वेश्याव्यवसाय चालवणाऱ्या हॉटेलवर छापा; दोघांना अटक.

आरोपींना २० फेब्रुवारीपर्यंत पोलिस कोठडी.

शिर्डी :- साईमंदिरापासून जवळ असलेल्या पिंपळवाडी रस्त्यीवरील हॉटेलमध्ये वेश्याव्यवसाय चालू असल्याचे सोमवारी टाकलेल्या छाप्यात उघड झाले.

हॉटेलचा मँनेजर योगेश अण्णासाहेब पवार (२७, माळीनगर, वैजापूर), ग्राहक म्हणून आलेला विजय एकनाथ गायकवाड (३८, कोपरगाव) या दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले. हॉटेलचालक नाना शेळके फरार झाला. आरोपींना २० फेब्रुवारीपर्यंत पोलिस कोठडी देण्यात आली.

शिर्डीत नव्याने हजर झालेले पोलिस उपअधीक्षक सोमनाथ वाकचौरे यांनी अवैध धंदे, फूटपाथवरील अतिक्रमण, साईभक्तांची फसवणूक करणारे यांच्या विरोधात धडक मोहीम सुरु केली आहे.

728 X90 Jeep Car