चारा छावण्या सुरू होण्यासाठी शिवसेनेचा रास्तारोको

मंगळवारी जिल्हाभरात रास्तारोको आंदोलन.

अहमदनगर :- दुष्काळी परिस्थिती लक्षात घेऊन राज्य सरकारने जनावरांसाठी चारा छावण्या सुरू करण्याबाबत दि. २५ जानेवारी २०१६ रोजी परिपत्रक जारी केले.

मात्र, त्यातील प्रशासनाने जाचक अटी शिथिल करून तात्काळ जिल्ह्यात चारा छावण्या सुरू कराव्यात अन्यथा मंगळवारी ( दि.१९) जिल्हाभरात रास्तारोको आंदोलन करण्यात येईल, असा इशारा शिवसेनेने दिला आहे.

शिवसेना उपनेते अनिल राठोड, जिल्हाप्रमुख प्रा. शशिकांत गाडे, घनश्याम शेलार आदींच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने शनिवारी जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांची भेट घेवून चारा छावण्या मंजुरीबाबत चर्चा करून निवेदन दिले.

728 X90 Jeep Car