विविध मागण्यांसाठी बीएसएनएल कर्मचारी आजपासून संपावर

बीएसएनएल कार्यालया समोर निदर्शने करुन संप.

अहमदनगर :- केंद्र सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे बीएसएनएलचे नुकसान होत असल्याचा आरोप करीत, विविध मागण्यांसाठी ऑल इंडिया युनियन्स अ‍ॅण्ड असोसिशन ऑफ बीएसएनएलच्या वतीने पुकारण्यात आलेल्या तीन दिवसीय संपाला पाठिंबा देत नगर मधील बीएसएनएल अधिकारी व कर्मचार्‍यांनी सोमवारी बीएसएनएल कार्यालया समोर निदर्शने करुन संप पुकारला.

यावेळी केंद्र सरकारच्या धोरणा विरोधात जोरदार घोणबाजी करण्यात आली. याप्रसंगी मोठ्या संख्येने अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. प्रारंभी जम्मू काश्मीरच्या पुलवामा जिल्ह्यात झालेल्या आत्मघातकी हल्ल्यातील शहिद जवानांना बीएसएनएलच्या वतीने श्रध्दांजली वाहण्यात आली.

नगर जिल्ह्यातील सुमारे एक हजार पेक्षा जास्त कर्मचारी या संपात उतरले आहेत. जिल्ह्यातील या संपाचे नेतृत्व बीएसएनएल ईयू संघटनेचे कॉ.आप्पासाहेब गागरे, विठ्ठल औटी, लालाजी शेख, विजय शिपणकर, रमेश शिंदे, एनएफटीइचे बजरंग घटे, त्रिंबक दुधाडे, स्नेहाचे कॉ.विजय पिंपरकर, एस.के. घुगे, बीएसएनएल ईएचे शिवाजी तांबे, रविंद्र शिंदे आदि करीत आहे.

बीएसएनएलला फोरजी स्पेक्ट्रम द्या, 15 टक्के वाढीसह वेतनाची पुनर्रचना अमलात आणा, बीएसएनएलच्या टॉवर्सचे आऊट सोर्सिंग बंद करा, बीएसएनएल च्या जमिनीचे व्यवस्थापन धोरण ठरवा, बीएसएनएलला बँकाकडून कर्ज घेण्यासाठी लेटर ऑफ कम्फर्ट द्या, सर्व मालमत्ता बीएसएनएलच्या नावावर करा आदि मागण्यांसाठी हे तीन दिवसीय संप पुकारण्यात आला आहे.

728 X90 Jeep Car