महिलेस शिवीगाळ, दमदाटी करून जीवे मारण्याची धमकी.

या जागेत पुन्हा यायचे नाही, असे म्हणून बेदम मारहाण.

अहमदनगर :- जागेत येण्यास मनाई करून तिघांनी भिंगार येथील ३५ वर्षीय महिलेस शिवीगाळ, दमदाटी करून जीवे मारण्याची धमकी दिली. बॅट व लाकडी दांडक्याने बेदम मारहाणही केली. ही घटना पाइपलाइन रस्त्यावरील इस्कॉन मंदिराजवळ १४ फेब्रुवारीला दुपारी दोन वाजता घडली.

कौशल्या दगडू तागड या इस्कॉन मंदिराजवळील जागेत गेल्या असता भाऊसाहेब धोंडिबा तागड, मंगेश भाऊसाहेब तागड, परिगाबाई दगडू तागड यांनी शिवीगाळ व दमदाटी करून ठार मारण्याची धमकी देत तुम्ही या जागेत पुन्हा यायचे नाही, असे म्हणून हातातील लाकडी दांडक्याने व बॅटने बेदम मारहाण केली.

728 X90 Jeep Car