शाश्‍वत जलस्त्रोतासाठी निंबळकच्या पाझर तलाव दुरुस्तीचे काम सुरु

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर :- शाश्‍वत जलस्त्रोत नसलेल्या निंबळक गाव जलसंपन्न होण्यासाठी जि.प. सदस्य माधवराव लामखडे यांच्या प्रयत्नाने जिल्हा परिषदेच्या माध्यमातून जलयुक्त शिवार अभियानातंर्गत दोन पाझर तलाव दुरुस्तीच्या कामाचे शुभारंभ करण्यात आले.

यावेळी सरपंच साधना लामखडे, उपसरपंच धनश्याम म्हस्के, माजी सरपंच विलास लामखडे, ठेकेदार प्रमोद गायकवाड, ग्रामविकास अधिकारी अनिल भाकरे, उप अभियंता गायकवाड, शाखा अभियंता उदमले, ग्रा.पं. सदस्य बाबासाहेब पगारे, भाऊराव गायकवाड, मारुती कोतकर, माधव रेपाळे, अशोक शिंदे, यमनाथ कोतकर, बाबासाहेब भोर, राजू कोतकर, राजाराम कोतकर, बी.डी. कोतकर, सुरेश होळकर, बाळासाहेब जाजगे, सुरेश गायकवाड, रामदास चोथे, सुशांत गायकवाड आदि उपस्थित होते.

नगर तालुक्यातील निंबळक येथे दोन पाझर तलाव असून, त्यांची पाणी साठवण क्षमता मोठी आहे. पाऊस चांगला झाल्यास हे पाझर तलाव पुर्णक्षमतेने भरत असतात. मात्र सदरील पाझर तलाव गळके असल्याने पावसाळ्यानंतर पाणी काही महिन्यातच निघून जात असे.

या पाझर तलावात पाणी साठवून त्याचा फायदा गाव परिसरातील शेतकर्‍यांना होण्यासाठी त्याच्या दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले आहे. वर्षा आडकाठी दुष्काळाला सामोरे जावे लागत असताना ही पाझर तलावे शेतीसाठी नवसंजीवनी ठरणार असल्याची भावना ग्रामस्थांनी व्यक्त केली.

तर सदर काम सुरु केल्याबद्दल लामखडे यांचे ग्रामस्थांच्या वतीने आभार मानण्यात आले. वारंवार दुष्काळी परिस्थितीचा सामना करत असताना गावे जलसमृध्द करणे काळाची गरज बनली आहे. गावे जलसमृध्द झाल्यास शेतकर्‍यांसह गावाचा विकास साधला जाणार आहे.

जलसुरक्षा निर्माण झाल्यास भविष्याचे नियोजन करुन वाटचाल करता येणार आहे. पाणी संवर्धनासाठी वेळीच उपाययोजना न झाल्यास भीषण संकट ओढवणार असून, यासाठी जागृक होण्याची गरज असल्याची भावना जि.प. सदस्य माधवराव लामखडे यांनी व्यक्त केली.

Leave a Comment