मोदीजी, परवानगी द्या, पाकिस्तानात जाऊन हल्ला करतो.

नगरच्या माजी सैनिकाचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र.

अहमदनगर :- पुलवामातील हल्ल्यावर प्रत्युत्तर म्हणून पाकिस्तानात जाऊन हल्ला करण्याची परवानगी मला देत असाल, तर मी जाण्यास तयार आहे, असे नगर जिल्ह्यातील कुशल महादेव घुले या माजी सैनिकाने म्हटले आहे.

सध्या अहमदनगर शहरात वास्तव्यास असणारे घुले यांनी भारतीय सैन्यात 17 वर्षे सेवा केली आहे.

पुलवामात झालेल्या हल्ल्याच उत्तर स्फोटकांनीच द्यावे लागेल, तरच पाकिस्तानला समजेल. पाकिस्तानचा नकाशाच जगाच्या नकाशावरुन हटवावा लागेल, तरच भारत आनंदात राहू शकेल आणि आता ती वेळही आली आहे,

अशा आशयाचे पत्र भारतीय सैन्यातील माजी सैनिकाने थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाठवले आहे.

पंतप्रधान मोदी यांना पाठविलेल्या पत्रात ते म्हणतात…
मोदीजी, मी कुशल महादेव घुले (माजी सैनिक). मी 17 वर्षे सैन्यात देशसेवा केली आहे. जम्मू-काश्मीरमध्ये सैनिकांना कसं जगावं लागतं, याची मला चांगली माहिती आहे. पाकिस्तानने 14 फेब्रुवारी 2019 रोजी पुलवामात केलेल्या हल्ल्याला स्फोटकांनीच उत्तर द्यावे लागेल. पाकिस्तानला जगाच्या नकाशावरुनच हटवावे लागेल. तरच भारत देश आनंदाने राहू शकतो. आता ती वेळही आली आहे. तुमच्यावर संपूर्ण देशाचा विश्वास आणि गर्व आहे, की तुम्ही पुलवामा हल्ल्याचा बदला नक्की घ्याल. सर्व राजकीय पक्षांना विनंती करतो की, देशाच्या सुरक्षेसाठी आणि पुलवामा हल्ल्याचा बदला घेण्यासाठी मोदींना साथ द्यावी.
मोदीजी, तुम्हाला विनंती करतो की, पाकिस्तानात जाऊन हल्ला करण्याची मला परावनगी दिल्यास, मी पाकिस्तानात जायला तयार आहे.

आपलाच माजी सैनिक
कुशल महादेव घुले

728 X90 Jeep Car