महाविद्यालयीन युवतीचा शेततळ्यात पडून मृत्यू.

हरभरा धुताना शेततळ्यात पडून १७ वर्षांच्या युवतीचा मृत्यू.

राहाता :- हरभरा धुताना शेततळ्यात पडून १७ वर्षांच्या महाविद्यालयीन युवतीचा मृत्यू झाला. ही घटना राहाता शहरातील पंधरा चारी भागात शुक्रवारी दुपारी घडली.

सायली विजय सदाफळ ही विद्यार्थिनी इयत्ता अकरावीत कोऱ्हाळे येथील श्रीगणेश इंटरनॅशनल स्कूलमध्ये शिकत होती. शुक्रवारी दुपारी हरभरा खाण्याकरिता ती शेतात गेली होती. हरभरा घेतल्यानंतर तो धुण्याकरिता त्यांच्याच मालकीच्या शेततळ्यावर ती गेली.

हरभरा धुताना पाय घसरुन ती पाण्यात पडली. नातेवाईकांनी तिला बाहेर काढून तातडीने ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. तथापि, वैद्यकीय अधिकाऱ्याने ती मरण पावल्याचे सांगितले.

728 X90 Jeep Car