बाळासाहेब नाहाटासह १३ जणांवर गुन्हे दाखल.

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

श्रीगोंदा :- मयत सभासदाच्या विमा रकमेत संगनमताने अपहार केल्याप्रकरणी श्रीगोंदा पोलीस ठाण्यात बाळासाहेब नाहाटा यांच्यासह 13 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

लोणी वि.का .सेवा संस्थेच्या तत्कालीन 13 संचालकाच्या संगनमताने 7/2/2015 ते 26/9/2018 या तीन वर्षांच्या काळात सदर अपहार प्रकरण घडले आहे.

यात संस्था रोज किर्द, व्हाऊचर आणि मयताची पत्नी यांनी दिलेले प्रतिज्ञापत्र यामध्ये विसंगती सापडली. संचालक मंडळ व सचिव यांनी खोटी व्हाऊचर तयार केली. बोगस नोंदी केल्या, खोटे आभिलेख तयार केले व मयत सभासद्च्या विमा रकमेचा अपहार केल्याचे सिद्ध झाले आहे.

कृषी ऊत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती प्रवीणकुमार नाहटा यांच्या सह लालासाहेब काकडे, सुभाष कोळपे, विठ्ठलराव खेडकर, मोहन काकडे, राजाभाऊ काकडे, बाबासाहेब कुदांडे, संभाजीराव काकडे, रुपाली काकडे, संतोष काकडे, भगवान धाकड, यांच्यासह सचिव बबन भागवत, श्रीपती साळवे अशा १३ जणांवर श्रीगोंदा पोलीस ठाण्यात महाराष्ट्र सहकारी कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Leave a Comment