45 वर्ष नगरसेवकपदाची धुरा सांभाळणारे नज्जू पैलवानांची पेढेतूला.

जनमतातून लोकप्रतिनिधीचे कार्यकर्तुत्व दिसते - अच्युतराव हंगे

अहमदनगर :- नगरपालिका ते महापालिकेत सलग नऊव्यांदा नगरसेवकपदी निवडून येणारे ज्येष्ठ नगरसेवक नज्जू पैलवान यांचा चाँद सुलताना हायस्कुलमध्ये नागरी सत्कार करण्यात आला.

कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून उल्हासनगर महापालिकेचे आयुक्त अच्युतराव हंगे उपस्थित होते. नज्जू पैलवान यांनी शहरातील नगरपालिका ते महापालिकेत केलेल्या सामाजिक कार्याने आपले प्रभुत्व सिध्द केले.

नऊव्यांदा नगरसेवकपदी निवडून येऊन त्यांनी 45 वर्षे शहराच्या विकासात्मक वाटचालीत योगदान दिले आहे. तसेच चाँद सुलताना हायस्कुलचे ते चेअरमन असून, शिक्षण क्षेत्रात देखील त्यांचे योगदान मिळत आहे.

त्यांनी नागरिकांचे अनेक समस्या मार्गी लावल्याने व प्रभागात केलेल्या विकासात्मक कार्याचा सन्मान म्हणून नुकताच हाजी नज्जू पैलवान यांचा नागरी सत्कार करुन त्यांची पेढेतूला करण्यात आली.

अच्युतराव हंगे म्हणाले की, जनमतातून लोकप्रतिनिधीचे कार्य कर्तुत्व दिसत असते. हाजी नज्जू पैलवान हे सर्वसामान्य नागरिकांचे प्रतिनिधित्व करीत असताना जनतेने चक्क त्यांना नऊव्यांदा निवडून देणे हे त्यांच्या कामाची पावती आहे.

नगरमध्ये सर्वसामान्य जनतेत मिसळून काम करणारा हा लोकप्रतिनिधी सेवक या भावनेने कार्य करीत असून, त्यांनी नागरिकांचे अनेक प्रश्‍न मार्गी लावले आहेत.

महापालिकेत सत्ता कोणत्याही पक्षाची असो जनतेची कामे करणारा लोकप्रतिनिधी म्हणून त्यांची ख्याती झाली असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.

सत्काराला उत्तर देताना हाजी नज्जू पैलवान म्हणाले की, मनुष्यरुपी ईश्‍वरसेवा नगरसेवक पदाच्या माध्यमातून करीत आहे.

जनतेचे प्रश्‍न केंद्रबिंदू मानून ते सोडविल्याने निवडणुकित पराजय कधी पत्कारावा लागला नाही. यावेळी देखील मोठा विश्‍वास टाकून जनतेने निवडून दिल्याबद्दल त्यांनी कृतज्ञता व्यक्त केली.

नज्जू पैलवान यांना शुभेच्छा देण्यासाठी शहरातील विविध क्षेत्रातील प्रतिष्ठित नागरिक मोठ्या संख्येने हजर होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन परवेज कादरी आलम यांनी केले.

कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी इलियास तांबोळी, आलिम हुंडेकरी, युसुफ तांबोळी, सुलेमान खान, सलीम शेख, एफ.एम. सय्यद, चाँद अन्सार, रजिया खान, खुदाबक्ष शेख, जफर सय्यद, शाहीद शेख आदिंनी परिश्रम घेतले.

728 X90 Jeep Car