खा.शरद पवार यांनी नगर दक्षिणेतून लोकसभा लढवावी.

महाराष्ट्र युथ कौंन्सिलचे अध्यक्ष रणजीत बाबर यांचे मागणी

अहमदनगर :- जिल्ह्याच्या दक्षिण भागात तिव्र दुष्काळी परिस्थिती असल्याने या भागात बेरोजगारीचा प्रश्न गंभीर बनला आहे. हे प्रश्न सोडवण्यात विद्यमान खासदार अपयशी ठरले आहेत.

विविध प्रश्न सोडवण्यासाठी आता माजी मंत्री शरद पवार यांनी लोकसभेची निवडणूक नगर दक्षिण मतदारसंघातून लढवावी अशी मागणी महाराष्ट्र युथ कौंन्सिलचे अध्यक्ष रणजीत बाबर यांनी केली आहे.

लोकसभा निवडणुकीची जागा काँग्रेसला मिळावी यासाठी जोरदार मागणी होत आहे, तथापि राष्ट्रवादी काँग्रेसने ही जागा देण्यास नकार दिला आहे. तर दुसरीकडे डॉ. सुजय विखे यांनी निवडणूक लढवण्याचा चंग बांधलेला आहे.

दरम्यान, महाराष्ट्र युथ कौंन्सिलच्या नगर जिल्हा कार्यकारिणीची बैठक अध्यक्ष रणजीत बाबर यांच्या अध्यक्षतेखाली पुणे येथे झाली. या बैठकीत नगर दक्षिण मतदार संघातील बेरोजगारी, गुन्हेगारी, टंचाई प्रश्न आदींवर चर्चा झाली.

बाबर म्हणाले, नगर मतदार संघातून अनेक वर्षे राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार निवडणूक लढवत आहेत. योग्य व अभ्यासू उमेदवार नसल्याने जनतेचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे.

यासाठी शेती, सिंचन, बेरोजगारी या सारख्या प्रश्नावर अभ्यास असणारे नेते शरद पवार यांनी नगर दक्षिणमधून लोकसभा निवडणूक लढवावी. किंवा शेती व बेरोजगारी आदी प्रश्नांची जाण असलेले डॉ. सुजय विखे पाटील यांच्यासाठी ही जागा सोडावी, अशी मागणी त्यांनी केली.

डॉ. विखे यांच्या उमेदवारीला युवकांचा पाठींबा असून यासंदर्भात लवकरच युवकांचे एक शिष्टमंडळ पवार यांची भेट घेणार असल्याचे बाबर यांनी स्पष्ट केले.

728 X90 Jeep Car