तापमान घसरल्याने नगरकर गारठले !

नगर शहराचे तापमान ४.४ अंश सेल्सिअस वर !

अहमदनगर :- थंडीने पुन्हा उच्चांक गाठला आहे. गेल्या अकरा वर्षांत सर्वात कमी तापमान शुक्रवारी नोंदवले गेले. शुक्रवारी नगर शहराचे तापमान ४.४ अंश सेल्सिअस होते. तापमान घसरल्याने नगरकर देखील गारठले आहेत.

गेल्या अकरा वर्षांत प्रथमच सर्वात कमी तापमानाची नोंद झाली आहे. जानेवारी महिन्यापासून थंडीचा कडाका कमी होतो. मात्र जानेवारी संपून आठ दिवस उलटले, तरी थंडी कमी होण्याऐवजी वाढतच आहे.

उत्तरेकडून वाहत असलेल्या थंड वाऱ्यामुळे त्याचा परिणाम तापमानावरही झाला आहे. डिसेंबर महिन्यात नगर शहराचे तापमान ७.८ अंशावर वर गेले होते. त्यानंतर देखील तापमानात घट झाली होती. १९ डिसेंबरला ४.५ तापमान नोंदवले गेले.

शुक्रवारी नगरचे तापमान ४.४ अंश सेल्सिअस नोंदवले गेले. वाढलेली थंडी रब्बीच्या पिकासाठी दिलासा देण्यासारखी असणार आहे. गव्हाच्या पिकाला ही थंडी अत्यंत पोषक ठरणार आहे.

728 X90 Jeep Car