बाजारभाव : फळभाज्या महागल्या. गहू, ज्वारी, हरभरा, तुरीचे भाव स्थिर.

अहमदनगर कृषी उत्पन्न बाजार समिती बाजारभाव. 

अहमदनगर :- शेतमालाला योग्य भाव मिळत नसल्याने बळीराजा मेटाकुटीला आहे. भुसार मार्केटमध्ये गहू, ज्वारी, हरभरा, तुरीचे भाव जरी स्थिर असले तरी शेतकऱ्याला योग्य भाव मिळत नसल्याने निराश आहे.

भाजीमार्केटमध्ये पालेभाज्यांनादेखील भाव मिळत नाही.कांद्याने तर शेतकऱ्यांचा अक्षरष: वांदाच केला आहे. त्याला पर्याय म्हणून असलेल्या अत्यल्प पाण्यावर शेतकऱ्यांनी भाज्यांचे उत्पादन घेतले.

मात्र कांद्यापाठोपाठ भाजीपाला अत्यल्प दराने विकला जात असल्याने शेतकऱ्यांच्या शेतकऱ्यांची अवस्था दुष्काळात तेरावा अशीच अवस्था झाली आहे.

अहमदनगर कृषी उत्पन्न बाजार समितीत मिळालेले बाजारभाव 

पालेभाज्या व फळभाज्या : टोमॅटो ५०० – १६००, वांगी ५०० – २०००, फ्लावर ५०० – २०००, कोबी ४०० – १५००, काकडी १००० – २५००, गवार ७००० – १०,०००, घोसाळे १५०० -४०००, दोडका ४००० – ५५००, कारले ४०००-५५००.

भेंडी १५०० – ४०००, वाल १००० – २५००, घेवडा ३०००-५०००, तोंडुळे – २००० – २५००, बटाटे ५०० – १५००, लसूण १५०० – ३५००, हिरवी मिरची २००० – ४०००, शेवगा २००० – ३५००, लिंबू १००० – २०००, आद्रक ३५०० – ५७००, गाजर – १००० – १८००.

दु.भोपळा ५०० – १६००, शिमला मिरची १५०० – ४००० मेथी १०० – ३००, कोथिंबीर १०० – ६००, पालक २०० – ४००, करडी भाजी ४००, शेपू भाजी – ५०० – ६००, चवळी – २०००-२५००,हरभरा जुडी ३०० – ६००, बीट ३०-५०, वाटाणा – १००० – २०००, डांगर ६००-१२००, कांदापात – ३००-४००.

ज्वारी गावराण १८७५ – २५०० बाजरी १४०० – १७००, गहू १९००- २२००, मका – १५०० – १६००, हरभरा – ४७००-४७३१, मूग ४५०० – ५१००, तूर ५४०० – ५४००, उडीद – ३९०० – ४०००, एरंडी – ३५५० – ३५५०, सोयाबीन – ४००० – ४५००. 

अंडी गावरान डझन : १०८, अंडी बॉयलर : ६०, चिकन प्रतिकिलो १६० रूपये .

728 X90 Jeep Car