माजी मंत्र्यांनी ३५ वर्षे केवळ फक्त थापा मारण्याचे काम केले !

श्रीगोंदा :- सर्वसामान्य जनतेने विश्वास ठेवून काम करण्याची संधी मला दिली आहे.त्या संधीचे सोने करणार आहे. केवळ थापा मारण्याचे व नारळ फोडण्याचे काम मी करत नसून, प्रत्यक्ष काम सुरु झाल्याशिवाय कधीही नारळ फोडत नाही.

या परिसरातील उर्वरीत कामांचा पाठपुरावा करुन निधी उपलब्ध करुन दिला जाईल व ती कामे देखील लवकर होतील. या रस्त्याच्या कामासाठी पाठपुरावा करुन निधी उपलब्ध करुन दिला आहे आता रस्त्याचे काम व दर्जा चांगल्या प्रकारे करुन घेण्याची जबाबदारी येथील स्थानिक नागरीकांची आहे. आवाहन आमदार राहुल जगताप यांनी केले.

श्रीगोंदा व नगर मतदार संघातील रस्त्यांच्या मजबुतीकरण व डांबरीकरणासाठी आ.राहुल जगताप यांनी निधी मंजुर करुन घेतला आहे त्यापैकीच मुख्यमंत्री ग्रामसडक योजने अंतर्गत ४२९.९५ लक्ष निधीचा बेलवंडी ते शिरसगाव (भाग लोणी व्यंकनाथ) (शिवरस्ता) ते शिरसगाव रस्ता कि.मी. ०/०० ते ७/५०० या रस्त्याचे कामांचे भूमीपुजन आमदार राहुल जगताप यांनी बेलवंडी बु.येथे केले.

यावेळी ते बोलत होते.यावेळी माजी जि.प.अध्यक्ष बाबासाहेब भोस, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अण्णासाहेब शेलार, मा.नगराध्यक्ष मनोहर पोटे, नूतन नगराध्यक्षा शुभांगी पोटे, नगरसेवक गणेश भोस, सतिष मखरे, संतोष कोंथिबीरे, सीमा गोरे, दिनेश इथापे यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.

यावेळी माजी जि.प.अध्यक्ष भोस म्हणाले की, ३५ वर्षात मंत्री असताना केलेली कामे व आ.जगताप यांनी फक्त ४ वर्षात केलेल्या कामांची तुलना करुन पहा.४ वर्षातील कामांची संख्या ही ३५ वर्षाच्या कामांपेक्षा जास्त असून कामे देखील दर्जेदार होत आहेत. माजी मंत्र्यांनी ३५ वर्षे केवळ फक्त थापा मारण्याचे काम केले.

728 X90 Jeep Car