टॉवरला बुटाच्या लेसने गळफास घेऊन युवकाची आत्महत्या

पारनेर :- कासारे येथील ३० वर्षांच्या युवकाने गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपवली. ही घटना ४ ते ६ फेब्रुवारीदरम्यान घडली.

यादव तुकाराम उमाप याने कर्जुले हर्या शिवारातील दरसोंड डोंगरावर नादुरूस्त बीएसएनएल टॉवरला बुटाच्या लेसने गळफास घेतला. तो ४ रोजी घरातून कामानिमित्त बाहेर गेला होता.

जनावरे चारणाऱ्यांना त्याचा मृतदेह दिसला. त्याच्यामागे आई, पत्नी, साडेतीन वर्षांची मुलगी, दोन वर्षांचा मुलगा, भाऊ, भावजय असा परिवार आहे.

728 X90 Jeep Car