दुष्काळी स्थितीत शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी – ग्रामविकासमंत्री मुंडे.

सोनई येथे विविध विकास कामाचे भुमिपूजन.

अहमदनगर :- जिल्ह्याला ग्रामविकास विभागाच्या माध्यमातून भरीव निधी दिल्याचे सांगताना दुष्काळी स्थितीत शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असल्याचे महिला व बाल विकास आणि ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी आज येथे सांगितले.

नेवासा तालुक्यातील सोनई येथे विविध विकास कामाचे भुमिपूजन ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांच्या हस्ते झाले. यावेळी आमदार बाळासाहेब मुरकुटे उपस्थित होते.

ग्रामविकासमंत्री मुंडे म्हणाल्या, केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजनांच्या माध्यमातून सर्वसामान्य माणूस केंद्रबिंदू मानून विकास साधला जात आहे. केंद्र शासनाकडून रस्त्यांच्या विकासासाठी राज्याला 882 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करुन देण्यात आला आहे.

राज्यात रस्त्यांची कामे गतीने सुरू आहेत. अहमदनगर जिल्ह्यालाही रस्त्यांच्या विकासासाठी भरीव निधी देण्यात आला आहे. नेवासा तालुक्यासह संपूर्ण जिल्ह्यात रस्त्यांची कामे सुरू आहेत.

बहुतांश रस्त्यांची कामे झाल्यामुळे शेतमाल बाजारपेठेत पाठविणे सुलभ झाले असून उर्वरित रस्त्यांची कामेही लवकरच पूर्ण करण्यात येतील, असे त्यांनी सांगितले. प्रधानमंत्री आवास योजनेच्या माध्यमातून राज्यात नुकतेच तीन लाख घरकुलाचे लोकार्पण करण्यात आले आहे.

सर्वसामान्य कुंटुबाला घरकुल मिळाल्याचे सांगून उज्वला गॅस योजना, सौभाग्य योजना अशा विविध योजनांचा सर्वसामान्य कुंटुबाला लाभ मिळाला आहे.

राज्यात शौचालयाची कामे मोठ्या प्रमाणात झाल्याचे सांगताना केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजनांच्या माध्यमातून शाश्वत विकास साधण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे त्यानी सांगितले. यावेळी शेतकरी, ग्रामस्थ महिला, युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते

728 X90 Jeep Car