महिलांचे दीड लाखाचे दागिने लांबवले.

श्रीरामपूर तालुक्यातील घटना.

श्रीरामपूर :- दोन महिलांच्या गळ्यातील सुमारे दीड लाखाचे दागिने चोरट्यांनी लांबवले.

डाकले इमारतीनजीक छाया विजय सोनी या मोटारीतून उतरून घराकडे येत असताना दुचाकीवर आलेल्या दोघांनी त्यांच्या गळ्यातील ७० हजारांचे दागिने लांबवले.

दुसरी घटना जुन्या वसंत चित्रपटगृहानजीक घडली. सुशीला अशोकचंद पांडे या रिक्षातून उतरून घरी जात असताना दुचाकीवर आलेल्या चोरट्यांनी त्यांच्या गळ्यातील लाखाचे गंठण लंपास केले.

728 X90 Jeep Car