वृद्ध आईला न सांभाळता मुलासह सुनेकडून मारहाण !

मुलगा व सुनेविरुद्ध पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल.

अहमदनगर :- वृद्ध असलेल्या आईला न सांभाळता उलट किरकोळ कारणातून मुलगा व सुनेने मारहाण केल्याची घटना घडली आहे.

याबाबत वृद्धेने नगर तालुका पोलिस ठाण्यात मुलगा व सुनेविरुद्ध फिर्याद दिली असून गुन्हा दाखल झाला आहे. नगर तालुक्यातील अकोळनेर येथे राहणाऱ्या बबई कचरु डोखे (वय ६५) या घरासमोर बसल्या होत्या.

त्याचवेळी बबई यांच्या कोंबड्या मुलाच्या घरासमोर गेल्या. याचा राग येवून बबई यांच्या स्नुषा स्वप्नाली हिने वाद घालून सासू बबई यांना दगडाने मारहाण केली. त्यानंतर वृद्धेचा मुलगा संतोष यानेही आपल्या आईस शिवीगाळ करुन मारहाण केली.

या मारहाणीत वृद्धेच्या गळ्यातील सोन्याची पोथ तुटून नुकसान झाले. वयोवृद्ध असतानाही सांभाळण्याची जबाबदारी मुलगा पार पाडित नाही. असे बबई डोखे यांनी फिर्यादीत म्हटले आहे. याप्रकरणी मुलगा व सुनेविरुद्ध नगर तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

728 X90 Jeep Car