एसटी बसमधून ९ लाखांचे सोन्याचे दागिने लंपास.

बसस्थानकावर संशयित फिरणाऱ्यावर कारवाईची मागणी.

जामखेड :- एसटी बसमधील गर्दीचा फायदा घेऊन चोरट्याने महिला डॉक्टरच्या बॅगेतून ८ लाख ८० हजार रुपयांचे २८ तोळे सोने लंपास केले. याबाबत पाटोदे (जि. बीड) पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करून जामखेड पोलिसांकडे वर्ग करण्यात आला आहे.

डॉ. क्षितिजा श्रीकांत घनवट (२७, नवी सांगवी, पुणे, हल्ली दिल्ली) यांनी फिर्याद दिली आहे. पुण्याहून सासरे पांडुरंग घनवट यांच्याबरोबर बीड येथे जाण्यासाठी त्या पुणे-बीड शिवशाही बसने निघाल्या.

जामखेड-बीडदरम्यानच्या प्रवासात बग उचकटलेली दिसली, म्हणून डॉ. क्षितिजा यांनी बॅगेची पाहणी केली असता सोन्याचे दागिने लंपास झाल्याचे आढळले.

दरम्यान, बसस्थानकावर प्रवाशांना लुटणाऱ्या चोरट्यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी नागरिकांसह प्रवशातून होत आहे. बसस्थानकावर पोलिसांची गस्त वाढवण्यात यावी, तसेच बसस्थानकावर संशयित फिरणाऱ्यावर कारवाईची मागणी करण्यात आली आहे.

728 X90 Jeep Car