राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या त्या सर्व नगरसेवकांची पक्षातून हकालपट्टी !

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर : महापौर निवडणुकीत भाजपला पाठींबा दिल्याने राष्ट्रवादी काँग्रेसच्या १८ नगरसेवकांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली असून शहर जिल्हाध्यक्ष माणिकराव विधाते यांनाही पदावरून हटविले आहे, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी याबाबत आदेश दिले आहेत.

अहमदनगरमध्ये महापौर आणि उपमहापौरपदाच्या निवडणुकीत भाजपने शिवसेनेला धोबीपछाड महापौरपद काबीज केले होते. शिवसेना हा सगळ्यात मोठा पक्ष असला तरी इतर सर्वपक्षीयांनी भाजप उमेदवाराला पाठिंबा दिला. त्यात राष्ट्रवादीच्या संपत बरस्कार यांनी आपला अर्ज मागे घेतला होता. राष्ट्रवादीच्या पाठिंब्यामुळे भाजपने ही महापौरपदाची निवडणूक जिंकली होती.

राष्ट्रवादी नगरसेवकांच्या या पाठिंब्यामुळे अध्यक्ष शरद पवार यांच्यासह सर्वच नेत्यांनी नाराजी व्यक्त केली होती. विशेष म्हणजे, पक्षनेतृत्वाचा विरोध असतानाही राष्ट्रवादीच्या स्थानिक नेत्यांनी महापौर निवडणुकीत भाजपला साथ दिली. या प्रकरणी जयंत पाटलांनी आधीच नगरसेवकांना नोटीस बजावली होती. अखेर या 18 नगरसेवकांची थेट पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे.

 

Leave a Comment