बांधकाम व्यावसायिकाची गोळी झाडून आत्महत्या.

रिअल इस्टेट क्षेत्रातील मंदी व्यावसायिकांच्या जीवावर!

- Advertisement -

मुंबई : रिअल इस्टेट क्षेत्रातील मंदी आता बांधकाम व्यावसायिकांच्या जीवावर बेतत असल्याचे दिसून येत आहे. प्रकल्प रखडल्याने मानसिक तणावाखाली असलेल्या चेंबूर येथील बिल्डरने स्वत:वर गोळी झाडून आत्महत्या केल्याची घटना गुरुवारी घडली.

मुंबईतील नामांकित बांधकाम व्यावसायिकांपैकी एक असलेल्या संजोना बिल्डर्सचे संजय अग्रवाल यांचे चेंबूर येथील सिंधी कॉलनीत कार्यालय आहे. गुरुवारी सकाळी साडेअकराच्या सुमारास ते कार्यालयातील त्यांच्या चेंबरमध्ये असताना त्यांचा मुलगा, नातेवाईक केबिन बाहेर होते.

त्या वेळी अग्रवाल यांनी त्यांच्या लायसन्सधारी रिव्हॉल्व्हरमधून स्वत:वर गोळी झाडून घेतली. गोळीचा आवाज येताच मुलगा व इतरांनी चेंबरमध्ये धाव घेतली असता ते रक्ताच्या थारोळ्यात पडल्याचे दिसून आले. त्यांना उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी अग्रवाल यांना मृत घोषित केले.

Demo 3 In News End 728*90