मनपा पाणी योजनेची वीज होणार खंडित ?

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर :- शहर पाणी पुरवठा योजनेच्या वीज पुरवठयाच्या बिलापोटी कोटयावधी रुपयांची थकबाकी मनपाने गेल्या काही महिन्यांपासून थकविल्याचे समोर आले आहे.

या प्रकरणी महावितरणद्वारे मनपाला नोटीस बजावून पाणी योजनेची वीज तोडण्याचा इशाराही देण्यात आला आहे.

थकबाकी १७९ कोटींवर पोहचली !
महापालिकेच्या पाणी योजनेची थकबाकी १७९ कोटींवर पोहचली असून शासनाच्या निर्देशानुसार महावितरणने मनपाला जुन्या थकबाकीचे हप्ते करुन दिले आहेत.

स्थायी समितीचे तत्कालीन सभापती व विद्यमान महापौर बाबासाहेब वाकळे यांनीच सभेमध्ये थकबाकीचे ३० समान हप्ते करुन थकबाकी भरण्यास मंजुरी दिली होती.

कोणत्याही क्षणी कारवाई …
गेल्या ५ महिन्यात थकबाकीपोटी भरावा लागणारे दरमहा १ कोटीचा हप्ताही मनपाने भरलेला नाही. तसेच नोव्हेंबर व डिसेंबर महिन्याची बिलेही मनपाने थकविली आहे.

नोटीस बजावल्यानंतर मनपाने २५ लाखांची रक्कम अदा केली आहे. मात्र, ती रक्कम पुरेशी नसल्याने व नोटिसीची मुदत संपलेली असल्याने महावितरणकडून कोणत्याही क्षणी कारवाई केली जाऊ शकते.

Leave a Comment