….अशा नोटिशींना घाबरत नाही – माजी आमदार अनिल राठोड

पोलिस अधिकार्‍यांना हाताशी धरून शिवसेनेला संपविण्याचे षडयंत्र ..

अहमदनगर :- नगर जिल्ह्यामध्ये कायदा व सुव्यवस्थेचा विषय गंभीर झाला आहे. केडगाव शिवसैनिकांच्या हत्याकांडाचा तपास तसेच माझ्या संदर्भात हद्दपारीच्या काढलेल्या नोटीसीचा जाब विचारण्यासाठी लवकरच विधानभवनासमोर उपोषणास बसणार असल्याचा इशारा शिवसेनेचे उपनेते अनिल राठोड यांनी दिला आहे.

राठोड म्हणाले की, दरवेळी शिवसेनेला टार्गेट करण्याचा प्रयत्न केला जात आहे. राजकारणामध्ये तसेच समाजकारणामध्ये पंचवीस वर्षापासून आमदार तसेच तीन वेळेला महापौर असे विविध पदे या नगर शहरांमध्ये शिवसेनेच्या माध्यमातून मिळाले आहेत.

नुकतीच झालेल्या महापालिका पदाच्या निवडणुकीत सुद्धा 24 जागा शिवसेनेला मिळाल्या आहेत. त्यामुळे शिवसेनेचे वर्चस्व नगर शहरामध्ये कायम आहे. पण अलीकडच्या काळामध्ये पोलिसांनी आपल्या अधिकाराचा गैरवापर सुरू केला असून काल आपल्याला हद्दपारीची नोटीस दिली आहे, त्याला उत्तर दिले आहे.

वास्तविक पाहता अशा नोटिशींना घाबरत नाही पण एक प्रकारे माझ्यावर कारवाई केल्यावर कार्यकर्ते भयभीत होतील, असे वातावरण तयार करायचे असा पोलिसांचा उद्योग सध्या सुरू असल्याचा आरोप त्यांनी यावेळी केला.

काही पोलिस अधिकार्‍यांना हाताशी धरून शिवसेनेला संपविण्याचे षडयंत्र आहे. माझ्या तडीपाडीचा प्रस्ताव तयार करणार्‍या अधिकार्‍याविरोधात मानहानीची केस दाखल करणार आहे, अशी माहिती शिवसेना उपनेते अनिल राठोड यांनी पत्रकार परिषदेत दिली.

भ्रष्ट व अकार्यक्षम अधिकार्‍यांना हटविण्यासाठी लवकरच विधानसभेसमोर उपोषण करण्यात येईल, असा इशारा त्यांनी दिला. केडगाव हत्याकांडातील मयत शिवसैनिकांच्या कुटुंबियांना अद्याप न्याय मिळालेला नाही.

त्यामुळे हे दोन्ही कुटुंब आपल्यासमवेत उपोषणात सहभागी होणार आहेत, असे ते म्हणाले. पोलिस स्टेशन हप्ते घेण्याचे अड्डे बनले आहेत, असा आरोप राठोड यांनी केला.

घनशाम पाटील यांनी सादर केलेला अहवाल कसा लिक झाला? असा सवालही त्यांनी उपस्थित केला. तडीपारीसंदर्भात आपल्याला नोटीस आलेली आहे. त्यास आपण उत्तर दिले आहे.

शहरात शिवसेनेचा 25 वर्षे आमदार, मंत्री तसेच तीन वेळा महापौर राहिला असल्याने शिवसेनेला संपविण्याचे हे षडयंत्र आहे. महापालिका निवडणुकीत जनतेने सोयर्‍या-धायर्‍याचे राजकारण व सत्तेचा वापर पाहिला आहे. तरीही महापालिका निवडणुकीत शिवसेनेच्या 24 जागा निवडूण आल्या आहेत, असेही राठोड म्हणाले.

728 X90 Jeep Car