…म्हणून झाला आमचा पराभव : माजीमंत्री बबनराव पाचपुते.

अमाप पैसा वापरल्याने आमच्या उमेदवाराचा पराभव.

श्रीगोंदे :- नगरपालिका निवडणुकीत झालेला भाजपच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार सुनीता शिंदे यांचा पराभव आम्ही स्वीकारला. विरोधकांनी प्रभाग सात व नऊमध्ये अमाप पैसा वापरल्याने आमच्या उमेदवाराचा पराभव झाला.

पालिकेत भाजपचे ११ नगरसेवक निवडून आले असल्याने मनमानी कारभार होऊ देणार नाही. गावाच्या विकासासाठी व चांगल्या कामाला सहकार्यच करू, असे माजी मंत्री बबनराव पाचपुते यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत सांगितले.

निवडणूक निकाल जाहीर झाल्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत पाचपुते म्हणाले, शहराच्या विकासासाठी आम्ही कायम कटिबद्ध असून जनतेला दिलेली आश्वासने पूर्ण करणार आहोत.

नगराध्यक्षपदाच्या उमेदवार सुनीता शिंदे व काही नगरसेवक निवडून आले असते, पण काही लोक प्रभाग सात व नऊमध्ये मतदानाच्या दिवशी दुपारी तळ ठोकून बसले. अमाप पैसा या प्रभागांतील मतदारांना देण्यात आला.

त्यामुळेच आमचा पराभव झाला. भाजपला जनतेने नाकारलेले नाही, उलट बहुमत दिले असून ११ जागा निवडून आल्या आहेत. काँग्रेसला सहा जागा, तर राष्ट्रवादीला अवघ्या दोन जागा मिळाल्या.

एवढेच नव्हे काँग्रेस-राष्ट्रवादीपेक्षा भाजपला १४४४ मते जास्त मिळाली आहेत, याचेही भान आघाडीने ठेवावे. नगराध्यक्षपद जरी आमच्याकडे नसले, तरी मनोहरचा मनमानी कारभार चालू देणार नाही.

728 X90 Jeep Car