श्रीगोंदा तालुक्यात ११ वर्षांच्या मुलीवर बलात्कार.

राहुल दत्तू रोकडे याच्यावर गुन्हा दाखल.

श्रीगोंदे :- तालुक्यातील अजनुज गावात अकरा वर्षांच्या शाळकरी मुलीवर बलात्कार केल्याप्रकरणी राहुल दत्तू रोकडे याच्यावर सोमवारी गुन्हा दाखल करण्यात आला.

याबाबत सविस्तर माहिती अशी कि, दुपारी एकच्या सुमारास ही मुलगी जेवणाच्या सुटीत घरी आली होती. जेवण करून पुन्हा शाळेत जात असताना जुन्या इंग्लिश शाळेजवळ रोकडे ऊर्फ बोंबल्या (२२) याने तिला अडवले.

बळजबरीने मोटारसायकलीवरून शाळेच्या आवारात नेत तेथील मुतारीमध्ये त्याने तिच्यावर बलात्कार केला. कोणाला सांगितल्यास जीवे मारण्याची धमकी त्याने दिली.

मुलीने आरडाओरडा केल्यावर जवळ असलेल्या तिच्या एका नातेवाइकाने घटनास्थळी धाव घेतली. कोणी तरी येत आहे, याची चाहूल लागताच रोकडेने तेथून पळ काढला.

रोकडेवर बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला. आरोपीचा शोध घेण्यासाठी पोलिस पथके रवाना करण्यात आली.

728 X90 Jeep Car