‘या’ गावाने घेतला खा. गांधी यांना गावात पाय ठेऊ न देण्याचा निर्णय !

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

राहुरी :- तालुक्यातील देसवंडी येथील ग्रामसभेत खा. दिलीप गांधी यांनी 15 वर्ष गावाकडे केलेल्या दुर्लक्षित भूमिकेमुळे संताप व्यक्त करण्यात आला. ग्रामस्थांनी खा. गांधी यांना गावात पाय ठेऊ न देण्याचा निर्णय घेतल्याची माहिती दिली आहे.

देसवंडी गावामध्ये सरपंच दीपक खेवरे यांच्या अध्यक्षतेखाली ग्रामसभा घेण्यात आली. ग्रामसेवक व्ही. आर. जगताप यांनी मागील सभेचे इतिवृत्त वाचन करीत प्रास्ताविक केले.

यावेळी ग्रामस्थांनी चर्चा करतानाा दि. 10 फेब्रुवारी रोजी नोकरशाही पंधरवडा सप्ताह साजरा करणे, स्पर्श कुष्ठरोग जनजागृती अभियान, तंबाखू सेवन दुष्परिणाम, प्लॅस्टीक बंदी, 13 कोटी वृक्ष लागवडीला प्रोत्साहन देणे आदी विषयांवर चर्चा करून सहभाग नोंदविण्याचा निर्णय घेण्यात आला.

याप्रसंगी ग्रामस्थांनी व ग्रामपंचायत पदाधिकार्‍यांनी विविध शासकीय योजनांच्या माहितीची अदान प्रदान केली. तसेच पाणीपट्टी व घरपट्टी वसुली, शालेय पोषण आहार, अंगणवाडी पोषण आहार प्रभावीपणे राबविण्याचा निर्णय घेण्यात आला.

घरकुलाची अपूर्ण कामे पूर्ण करीत वंचित गरजवंतांना घरकूल प्राप्त होण्यासाठी पुढाकार घेण्याचा निर्णय घेण्यात आला. गावात ग्रामसुरक्षा दलाचा आढावा घेणे, हाताने मैला उचलण्यास बंदी याबाबत चर्चा होऊन विशेष माहिती देण्यात आली.

ग्रामस्थांनी तंबाखू सेवन न करणे, कृष्ठरोग होऊ नये म्हणून दक्षता घेण्याची शपथ ग्रामस्थांनी घेतली. राहुरी खुर्द ते चंडकापूर रस्त्याचे काम सुरू होत असून रस्त्याचे रुंदीकरण होण्यास ग्रामस्थांनी सहकार्य करावे तसेच अतिक्रमण काढून घ्यावेत, आदी निर्णय घेण्यात आले.

ग्रामसभा सुरू असतानाच खा. दिलीप गांधी यांच्याकडून 15 वर्षांत 1 रुपयाचाही निधी गावाला मिळाला नाही. यामुळे ग्रामस्थांनी तीव्र संताप व्यक्त करीत यापुढे खा. गांधी यांना गावात पाय ठेऊ न देण्याचा सर्वांनी एकमुखी निर्णय घेतला.

Leave a Comment