चाकूहल्ला करून सव्वादोन लाख रुपये लंपास.

तीन अज्ञात चोरट्यांविरोधात जामखेड पोलीस ठाण्यात गुन्हा.

जामखेड :- तालुक्यातील राजुरी येथील ओम साई संगमनेश्वर पेट्रोल पंपावर दोघांना चाकूने मारहाण करून सव्वादोन लाख रुपयांची रोख रक्कम अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना घडली आहे.

या प्रकरणी तीन अज्ञात चोरट्यांविरोधात जामखेड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की जामखेड-खर्डा रस्त्यावर दहा कि.मी अंतरावर राजुरी या ठिकाणी ओम साई संगमनेश्वर पेट्रोल पंप आहे.

बुधवार दि. 23 रोजी रात्री पेट्रोल पंप कर्मचारी सचिन युवराज कोल्हे व त्यांचे मित्र सागर बुवासाहेब कोल्हे, दत्तात्रय शिवाजी डोंगरे हे त्यांची पेट्रोल पंपावर लावलेली मोटारसायकल घेण्यासाठी आले होते.

त्यावेळी त्या ठिकाणी काही अज्ञात व्यक्‍ती दारु पीत बसले होते. त्यावेळी दारु पीत असलेल्यांनी त्या दोघांना म्हणाले, आम्हाला पेट्रोल पंप लुटायचा होता. तुम्ही आमच्या कामात व्यत्यय कशाला आणला असे म्हणून कर्मचाऱ्यांना चाकूने मारहाण करून जखमी केले.

पेट्रोल पंपाच्या कॅबिनचा दरवाजा तोडून 2 लाख 15 हजार रुपयांची रक्कम चोरुन नेली. या प्रकरणी सचिन कोल्हे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून तीन अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

728 X90 Jeep Car