कर्जबाजारीपणाला कंटाळून शेतकऱ्याची आत्महत्या.

संगमनेरच्या कनोली येथील शेतकऱ्याची विष पिऊन आत्महत्या...

संगमनेर :- कर्जबाजारीपणाला कंटाळून संगमनेरच्या कनोली येथील शेतकऱ्याने राहात्या घरात विष पिऊन आत्महत्या केल्याचे समोर आले आहे. दत्तात्रेय नानासाहेब वर्पे (३८) असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे.

त्याने राहत्या घरात विष पिउन आत्महत्या केली. गुरुवारी सकाळी पत्नी शेतात पाणी भरण्यासाठी गेली असता घरात कोणी नसल्याचे बघून त्याने आत्महत्या केल्याचे समोर आले.

घरी आलेल्या पत्नीला औषधाचा वास आल्याने तिने शेजारी राहत असलेल्या सासऱ्यांना बोलावून माहिती दिली. त्यांना संगमनेर येथे उपचारासाठी हालवले मात्र उपचारा पुर्वीच त्याचा मृत्यू झाला होता. वर्पे यांच्या मागे आई वडील पत्नी एक मुलगा एक मुलगी असा परिवार आहे.

728 X90 Jeep Car