राहत्या घरात गळफास घेऊन विवाहित तरुणाची आत्महत्या.

घरातील किरकोळ भांडणावरून तरुणाने उचलले टोकाचे पाउल.

कोपरगाव :- शहरातील मोहिनीराज नगर भागात रविवारी (दि. २०) रोजी सायंकाळी साडेसहा सात वाजेच्या सुमारास राहत्या घरात गळफास घेऊन या तरुणाने आत्महत्या केली.

याबाबत मिळालेली माहिती अशी की, कोपरगाव शहरातील मोहिनीराज नगर भागात राहणाऱ्या सचिन सर्जेराव सुपेकर (वय २३) व्यवसाय पेंटिंग काम करणाऱ्या तरुणाने रविवारी (दि.२०) सायंकाळी साडेसहा ते सातच्या सुमारास घरातील किरकोळ भांडणावरून राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली.

कोपरगाव ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले. याबाबत दीपक पंढरीनाथ सुपेकर (रा. पोहेगाव, ता. कोपरगाव) यांनी कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात खबर दिली असून त्यावरून कोपरगाव पोलीस ठाण्यामध्ये अकस्मात मृत्यूचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.

728 X90 Jeep Car