सख्ख्या भावांत झालेल्या भांडणात एकाचा मृत्यू.

श्रीगोंदे तालुक्यातील घटना.

श्रीगोंदे :- तालुक्यातील हिरडेवाडी येथे सख्ख्या भावांत किरकोळ कारणातून झालेल्या भांडणातून रावसाहेब कापसे यांचा मृत्यू झाला.

याप्रकरणी सुनीता रावसाहेब कापसे यांच्या फिर्यादी वरून दत्तात्रय कापसे व सुशिला कापसे यांच्या विरोधात श्रीगोंदे पोलिसात शनिवारी रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हिरडेवाडी येथे गुरुवारी रात्री १२ वाजे दरम्यान फिर्यादीचे कांदे घेऊन जाण्यासाठी टेम्पो आला होता. तो टेम्पो बोअरच्या पाइप वरून घेऊन जाऊ देऊ नका, असे आरोपींनी टेम्पो चालकाला सांगितले.

याचा राग मनात धरून रावसाहेब कापसे यांच्या डोक्यात आरोपींनी गजाने मारहाण करून जखमी केले होते. या प्रकरणी श्रीगोंदे पोलिसात खुनाचा गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

728 X90 Jeep Car