पारनेर सैनिक सहकारी बँकेच्या अधिकाऱ्यांसह चेअरमन विरोधात गुन्हा दाखल

परस्पर खात्यातून पैसे काढणाऱ्या बँकेच्या अधिकाऱ्याविरुद्ध गुन्हा

पारनेर :- परस्पर खात्यातून ३८ हजार रुपये काढून फसवणूक केल्याप्रकरणी पारनेर सैनिक सहकारी बँकेच्या अधिकाऱ्यांसह चेअरमन व सहा जणांविरुद्ध पारनेर पोलिस स्टेशनमध्ये फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 चेअरमन व अधिकारी यांच्याविरुद्ध गुन्हा

चंद्रकांत पाचारणे यांची पत्नी व त्यांच्या नावावर पारनेर शाखेत संयुक्त खाते होते. या खात्यातून २०१४ मध्ये दोन वेळा अज्ञात व्यक्तीने ३८ हजार ६५८ रुपये खात्यातून काढून घेतले,’ असे फिर्यादीत म्हटले आहे. त्यानुसार बँकेचे चेअरमन व अधिकारी यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

खातेदार चंद्रकांत विठ्ठल पाचारणे (रा. पारनेर) यांच्या फिर्यादीवरून बँकेचे चेअरमन शिवाजी तुकाराम व्यवहारे, शाखा व्यवस्थापक संजय बाजीराव कोरडे, तत्कालीन शाखा अधिकारी अनिल नामदेव मापारी, उपशाखाधिकारी प्रवीण नाथाजी निघुट, आप्पासाहेब बबन थोरात, कर्मचारी भरज गजाबापू पाचारणे यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

728 X90 Jeep Car