माजी आमदार गडाखांकडून अटक वॉरंटचे प्रदर्शन !

गडाखांकडून भावनिक राजकारण - आमदार बाळासाहेब मुरकुटे

नेवासे :- माजी आमदार शंकरराव गडाख हे अटक वॉरंटचे तालुक्यात प्रदर्शन करत आहेत. तालुक्यात भावनिक वातावरण तयार करून वेगळ्या दिशेला नेऊन जनतेची दिशाभूल करण्याचा केविलवाणा प्रयत्न त्यांच्याकडून केला जात आहे, असा आरोप आमदार बाळासाहेब मुरकुटे यांनी केला.

बेलपिंपळगाव येथे आमदार मुरकुटे यांच्या विशेष प्रयत्नातून मंजूर झालेल्या बेलपिंपळगाव ते घोगरगाव रस्ता मजबुतीकरण व डांबरीकरण करणे, बेलपिंपळगाव ते कारवाडी रस्ता, हनुमान मंदिरा समोर पेव्हिंग ब्लॉक बसवणे, स्वागत कमान, खंडोबा मंदिरा समोर सभामंडप बांधणे, शौचालय बांधणे व व्यायाम शाळा साहित्य आदी विविध विकास कामांचा शुभारंभ व लोकार्पण सोहळा आमदार मुरकुटे यांच्या हस्ते झाला. त्यावेळी ते बोलत होते.

आमदार मुरकुटे म्हणाले, बेलपिंपळगाव हे एक क्रांतिकारी गाव आहे. माजी आमदारांना जर बेलपिंपळगाव गावची व्याख्या कळली तर वाल्याचा वाल्मिक झाल्या शिवाय रहाणार नाही, अशी टीका मुरकुटे यांनी माजी आमदार गडाख यांच्यावर केली.

728 X90 Jeep Car