अल्पवयीन मुलीवर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न

कर्जत तालुक्यातील रवळगाव येथील आरोपी फरार.

कर्जत :- तालुक्यातील रवळगाव येथे तीन वर्षांच्या एका अल्पवयीन मुलीवर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल झाला असून, या प्रकरणातील आरोपी फरार झाला आहे. हा प्रकार दि.१७ रोजी सायं. साडेसहाच्या सुमारास घडला.

याबाबतची माहिती अशी की, कर्जत तालुक्यातील रवळगाव येथे दि.१७ जाने रोजी सायं साडेसहाच्या दरम्यान गावात असलेल्या एका किराणा दुकानाज़वळील रस्त्याच्या कडेला असलेल्या पडक्या घरातून एका तीन वर्षे वयाच्या मुलीच्या ओरडण्याचा आवाज आला.

यामुळे तिच्या आजीने आवाजाच्या दिशेने पडक्या घराकडे धाव घेतली असता, तेथे फिर्यादीच्या नातीससह आरोपी संतोष लक्ष्मण अडागळे हा आढळून आला. या वेळी फिर्यादी आजीने संतोष यास काय करतो, असे विचारले असता, तो काहीच बोलला नाही.

माझ्या लेकराला काय करतो, असे म्हणत सदर मुलीच्या आजीने आरोपी संतोष याच्या गालावर चपला मारल्या. याचवेळी संतोष हा या मुलीला सोडून पळून गेला. याप्रकरणी अज्ञान मुलीचा विनयभंग केला असल्याची तक्रार या मुलीच्या आजीने आज दि.१८ जाने रोजी पोलिसांत दाखल केली आहे. त्यावरून कर्जत पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल झाला आहे.

728 X90 Jeep Car