डॉन बॉस्को शाळेच्या सहल बसला अपघात,दोघांचा मृत्यू

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर :- सावेडी परिसरातील डॉन बॉस्को शाळेतील विद्यार्थ्यांची सहल घेऊन जाणार्‍या खाजगी ट्रॅव्हल बस व पिकअप व्हॅनचा आळेफाट्याजवळ भीषण अपघात झाला. या दुर्घटनेत पिकअप चालकाचा होरपळून मृत्यू झाला. तसेच आणखी एकाचा मृत्यू झाला आहे.

एक शिक्षक अत्यवस्थ असल्याचे सांगण्यात आले. 27 मुले जखमी झाली आहेत. त्यांना उपचारासाठी रुग्णालयात हलविण्यात आले आहे.ओतुरमधील आळेफाटा पासून दहा किलोमीटर अंतरावर गायमुखवाडी याठिकाणी काल रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास अपघात झाला.

पोलिसांनी अपघातग्रस्त वाहने जेसीबीच्या सहाय्याने बाजूला करून रस्ता वाहतुकीसाठी खुला केला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अहमदनगर येथील सावेडी येथील डॉन बॉस्को विद्यालयाचे नववी, दहावी, अकरावी व बारावीचे विद्यार्थी शैक्षणिक सहल खासगी ट्रॅव्हलद्वारे नगर-कल्याण मार्गाद्वारे जात होत.

या बसमध्ये 40 विद्यार्थी होते. ही बस नगर-कल्याण महामार्गावर असणार्‍या आळेफाट्याच्या पुढे 10 किलोमीटरवरील गायमुखवाडी येथून जात असताना कांद्याचा पीकअपची समोरासमोर जोरदार धडक झाली. या बसने पिकअपला 200 फाटापर्यंत मागे ओढत नेली.

हा अपघात इतका भीषण होता की त्यात दोन्हीही वाहनांनी पेट घेतला. यामध्ये पीकअप वाहनाचे व बसचे नुकसान झाले. त्यात विद्यार्थ्यांचा मदतीसाठी एकच आक्रोश सुरू झाला. प्रचंड आवाज व मुलांंच आक्रोश यामुळे आसपासचे लोक घटनेच्या दिशेने गेले.

या अपघातामुळे विद्यार्थी प्रचंड घाबरून गेले होते. उपस्थित असलेल्या ग्रामस्थांनी मिळेल त्या वाहनाने जखमी झालेल्या विद्यार्थी व शिक्षकांना कोकणे, वाणी, सोनवणे या खासगी रूग्णालयात हलविल्यात आले असून डॉक्टरांनी त्वरीत उपचार सुरू केले.

यात दोन शिक्षक अत्यवस्थ असून 27 विद्यार्थ्यांना मार लागल्याचे सांगण्यात आले. तर घटनेची माहिती कळताच आ. संग्राम जगताप यांनी या घटनेची माहिती घेतली. तसेच विद्यार्थ्यांना नगरला आणण्यासाठी वाहनाची व्यवस्था केली.

Leave a Comment