श्रीगोंद्यात ट्रॅक्टरखाली चिरडून दोघांचा मृत्यू.

नशीब बलवत्तर म्हणून ३ वर्षांची आराध्या थोडक्यात बचावली...

श्रीगोंदे :- तालुक्यातील मढेवडगाव येथे ऊसवाहक ट्रॅक्टरला ओव्हरटेक करताना दोन मोटर सायकलींची बुधवारी दुपारी धडक झाली. या अपघातात दोघांचा मृत्यू झाला, तर अन्य दोघे जखमी झाले.

नगर-दौंड महामार्गाचे काम सुरू आहे. बुधवारी दुपारी एक वाजण्याच्या सुमारास चौरंगेनाथ विठोबा शिर्के (वय ५५, रा. बाबुर्डी, ता. श्रीगोंदा), त्यांची मुलगी कल्पना संतोष कदम (वय ३०, रा. पिंपळगाव पिसा, ता. श्रीगोंदा) आणि आराध्या संतोष कदम (वय ३ वर्षे) हे दुचाकीवरून दौंडकडे जात होते.

उसाच्या ट्रॅक्टरची धडक बसल्याने मृत्यू…

मढेवडगावातील न्यू इंग्लिश स्कूल शाळेच्या समोर उसाच्या ट्रॅक्टरची (एम एच १६ एफ ६७२८) त्यांना जोरात धडक बसली. यामध्ये चौरंगेनाथ शिर्के जागीच ठार झाले. कल्पना कदम हिला उपचारासाठी दौंडला नेले जात असताना तिचाही मृत्यू झाला.

नशीब बलवत्तर म्हणून आराध्या थोडक्यात बचावली.

मात्र, या अपघातात नशीब बलवत्तर म्हणून मृत कदम यांची ३ वर्षांची कन्या आराध्या थोडक्यात बचावली. अपघातानंतर कार्यकर्त्यांनी तातडीने हालचाली करून रुग्णवाहिका बोलावून कदम यांना रुग्णालयात हलविले, मात्र त्यांच्या प्रयत्नांना यश आले नाही.

728 X90 Jeep Car