दोन अपघातांमध्ये दोन महिला ठार.

एक महिला जबर जखमी.

शेवगाव :- तालुक्यात दोन ठिकाणी झालेल्या अपघातांत दोन महिलांचा जागीच मृत्यू झाला, तर एक महिला जबर जखमी झाली.

सकाळच्या दरम्यान गेवराई रस्त्यावर फिरण्यासाठी गेलेल्या हिराबाई सोमनाथ उदावंत (वय ५०) व सरला शेषराव औटी (वय५५)) यांना अज्ञात वाहनाची पाठीमागून जोराची धडक बसली. त्यात उदावंत यांचा जागीच मृत्यू झाला, तर औटी जबर जखमी झाल्या.

त्यांना खासगी रूग्णालयात दाखल करण्यात आले. सोमनाथ उदावंत यांच्या फिर्यादीवरुन पोलिसांनी अज्ञात वाहनचालकाविरुध्द गुन्हा दाखल केला.

ढोरजळगाव येथील दुसऱ्या अपघातात प्रभात कंपनीच्या दूध वाहतूक करणाऱ्या टाटा एसी वाहनाची (एमएच १७ बीवाय ५५८) गुंफाबाई अंबादास पाटेकर (वय ६५, राहणार ढोरजळगाव) यांना धडक बसली. त्यात पाटेकर यांचा जागीच मृत्यू झाला.

728 X90 Jeep Car