नगर-सोलापूर रस्त्यावर अपघातात २ ठार.

मालवाहू ट्रेलर व महिंद्रा टीयुव्हीची धडक

मिरजगाव :- नगर-सोलापूर रस्त्यावर मांदळी शिवारात झालेल्या अपघातात दोन ठार, तर पाचजण गंभीर जखमी झाले.

जुन्या शिवानी हाॅटेलसमोर मंगळवारी पहाटे चारच्या सुमारास मालवाहू ट्रेलर व महिंद्रा टीयुव्हीची धडक झाली. कर्नाटक राज्यातील बाकुट जिल्ह्य़ातील हे भाविक शिर्डीकडे देवदर्शनासाठी निघाले होते.

नगरकडून आलेला राजस्थान पासिंगचा ट्रेलर व कर्नाटक पासिंगची महिंद्रा टीयुव्हीची समोरासमोर धडक झाली. संक्रांतीच्या दिवशीच काळाने या भाविकांवर घाला घातला.

चालक व समोर बसलेले गोविंदराज एच्. बंडी (वय ३०) व अन्नपूर्णा पाटील (४०) हे जागीच ठार झाले. लक्ष्मी देसाई, शिल्पा बी. मठ, शिवय्या बी. मठ, विक्रम बी. मठ व अरुणकुमार एस. मठ हे गंभीर जखमी झाले.

728 X90 Jeep Car