जामखेड मध्ये अकरा वर्षांच्या मुलीवर बलात्कार

बालाजी अंबादास डाडर (४० वर्षे) याच्यावर गुन्हा दाखल

जामखेड :- मधील चुंबळी येथील अकरा वर्षांच्या मुलीवर बलात्कार केल्याची संतापजनक घटना घडली असून बालाजी अंबादास डाडर (४० वर्षे) याच्यावर मंगळवारी गुन्हा दाखल करण्यात आला.

याबाबत सविस्तर माहिती अशी कि, दि. १२ रोजी मुलीचे वडील जामखेडला व आई वीटभट्टीवर कामाला गेले होते. सायंकाळी या नराधमाने मुलीला आपल्या घरी बोलवत मारहाण करुन बलत्कार केला.

दुसऱ्या दिवशी रात्री आठ वाजता पुन्हा या मुलीस घरी बोलावून चाकूने मारहाण करून घडलेला प्रकार कोणाला सांगितला, तर तुला जीवे मारेन अशी धमकी दिली.

नंतर पीडित मुलीने आई-वडिलांना ही घटना सांगितली. त्यांनी जामखेड पोलिस ठाण्यात धाव घेतली. या अगोदर आरोपीने अनेक वेळा या मुलीची छेड काढत त्रास दिला होता. 

728 X90 Jeep Car